Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

43 वर्षांनंतर पुन्हा भरली कोतुळची शाळा

विद्यार्थ्यांनी शाळेला पन्नास हजार रुपयांची गुरुदक्षिणा

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रयत शिक्षण संस्थेचे  कोतुळेश्‍वर विद्यालय कोतुळ या विद्यालयात तब्बल 43 वर्षांनी  विद्यार्थी विद्यार्थिनी एक

संभाजी महाराज जयंतीनिमित्त सावेडी उपनगरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पहिला आठवडा कधी उजाडणार ?
गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटीवर

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रयत शिक्षण संस्थेचे  कोतुळेश्‍वर विद्यालय कोतुळ या विद्यालयात तब्बल 43 वर्षांनी  विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित आलेआणि आपल्या शिक्षकांचे गुरुपूजन केले त्यावेळी शिक्षण देणार्‍या गुरुजनांचा या माजी विद्यार्थायनी सत्कार केला. निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे या विद्यालयाच्या  1980 च्या बॅच विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर स्नेहसंमेलन संमेलन जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कृषिमित्र सयाजीराव गोपाळराव देशमुख होते.
शिवाजी देशमुख, शाहीर तुळशीराम जाधव, ज्ञानदेव घोलप, संजय देशमुख, प्रदीप बोर्‍हाडे बाळासाहेब कोरडे, रमेश आहेर, निवृत्ती आरोटे, व राजेंद्र  परशुरामी यांनी या मेळाव्याचे आयोजन  केले होते. सदर कार्यक्रमास तत्कालीन सात गुरुवर्य शिक्षक तब्बल 43 वर्षानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटले होते त्यांनीही या कार्यक्रमाचे फार कौतुक केले व आता साठी पर्यत पोहचलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोतुळेश्‍वर विद्यालय कोतुळ मुख्याध्यापक इरणक यांनी ही मार्गदर्शन केले. तब्बल 43 वर्षानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी सदगदित व हर्ष उल्हासितपणे एकमेकांना भेटले सदर स्नेह संमेलन सोहळा मोठ्या आनंदाचा व अतिशय हर्ष उल्हासाचा होता एकमेकांसोबत स्नेहभोजन चहा नाश्ता स्नेह भोजन घेत जुने सवं गडी काही काळ गप्पा मध्ये रंगले. सदर कार्यक्रमप्रसंगी उपस्थितीत माजी विदयार्थीनी शाळेला गुरुदक्षिणा म्हणून पन्नास हजाराची रुपयाची देणगीची भेट दिली.

COMMENTS