Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम उत्साहात

अकोले /प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी दिलेल्या निर्देशान

शेवगावात बदलापूर घटनेचा निषेध
महात्मा फुले कृषि विद्यापीठाला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
Ahmednagar : जिल्ह्यातील लॉकडाउनला विरोध…भाजप आमदारांच्या भागात कडक लॉकडाउन (Video)

अकोले /प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना,विद्यार्थी कल्याण विभाग,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र व ग्रीन क्लब यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ऑक्टो.2023 रोजी सकाळी 10 वा.स्वच्छता रॅली चे आयोजन करून राजूर येथील बस स्थानक परिसर, पोलीस स्टेशन परिसर, तसेच स्मशानभूमी इ. ठिकाणी स्वच्छता करण्यात आली होती, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली.
क्लीन इंडिया ग्रीन इंडिया, करा करा स्वच्छ करा’ देश आपला स्वच्छ करा, महात्मा गांधी की जय अशा प्रकारच्या घोषणा देत या स्वच्छता रॅलीचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे हस्ते करण्यात आला. महाविद्यालयापासून ही रॅली गणेश मंदिर ते कोल्हार घोटी राष्ट्रीय महामार्ग या  मुख्य रस्त्याने जात असताना बस स्थानक परिसर, राजुर पोलीस स्टेशन परिसर व स्मशानभूमी इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. किरणजी लहामटे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दातरे, पत्रकार, राजुरच्या  सरपंच पुष्पाताई निगळे, बसस्थानक नियंत्रक देशमुख, राजुर ग्रामपंचायतीचे कर्मचारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी देखील सहभाग घेऊन स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कमवा व शिका योजना तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भरीव योगदान दिले.त्याबद्दल डॉ.किरण लहामटे यांनी त्यांचे कौतुक केले. ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रा. रोहित मुठे ( एनसीसी कमांडर) प्रा.बी.के.थोरात (रासेयो समन्वयक), डॉ वाल्मीक गीते, प्रा.संतोष अस्वले, प्रा कासार, प्रा. नितीन देशमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS