Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऍड.देशमुख महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात 

अकोले : राजूर येथील ऍड.एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी कै. होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक राज्

उत्तरेतील बहुतांश धरणे ‘दादां’ मुळेच
मवेशीमध्ये पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण
बालआनंद मेळाव्यामुळे उद्योजकीय कौशल्यांचा विकास : देसाई 

अकोले : राजूर येथील ऍड.एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी कै. होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक राज्यस्तरीय वादविवाद व कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.

 स्पर्धेचे पारितोषिक वितरण सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्रीराम पन्हाळे व  सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरामशेठ पन्हाळे यांनी वाचन, अवलोकन आणि मेहनत करून वक्तृत्व घडविता येते तर सखोल अभ्यासातून वादविवादात यश संपादन करता येते असे प्रतिपादन केले.

 राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा कै. होनाजी तुकाराम कोंडार सांघिक फिरता स्मृतीचषक संगमनेरच्या श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या इरफान शेख व आकाश बोडखे या संघाने जिंकला, तर कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक स्मृतिचषक अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या प्राची कोकणे व ऋतुजा बगनर या संघाने जिंकला.

 महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख पाहुण्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रा. डॉ. सुनील शिंदे, प्रा. विनोद येलमामे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. भाऊसाहेब देशमुख यांनी भूषविले.  प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. रावसाहेब ननावरे, आभार प्रदर्शन वादविवाद व वक्तृत्व मंडळ कार्याध्यक्ष डॉ. पंढरीनाथ करंडे आणि सूत्रसंचालन प्रा. गणेश कुसमुडे यांनी केले. स्पर्धांच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS