Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी स्वता: ची ओळख निर्माण करावी अ‍ॅड.अस्मिता मोरे यांचे प्रतिपादन

उस्माननगर प्रतिनिधी - सतत अभ्यास करून ठरवूनच अधिकारी झाले.या पुढील  अधिकारी पदावरून लोकांना न्याय देण्यासाठी आयुष्य देणार आहे   आपल्या मनामध्ये

उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथे तूर पीक पाहणी कार्यक्रम संपन्न | LOKNews24
घराचा दरवाजा तोडून दागिने घेवून चोरटे पसार  
मुंबई लोकल रेल्वे बनली कुस्तीचा आखाडा

उस्माननगर प्रतिनिधी – सतत अभ्यास करून ठरवूनच अधिकारी झाले.या पुढील  अधिकारी पदावरून लोकांना न्याय देण्यासाठी आयुष्य देणार आहे   आपल्या मनामध्ये जिद्द , चिकाटी , मेहनत करून यश मिळवून स्वता: ची ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता वर्ग 1 राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेल्या ड. अस्मिता एकनाथराव मोरे यांनी उस्माननगर येथील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना गुरुवारी दि. 17 रोजी केले.
उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी व सिनेअभिनेते एकनाथ मोरे, साहित्यिक प्रा. हनुमंत भोपाळे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, प्रदीप देशमुख, माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पहार देवून सत्कार केला.  यावेळी प्रा. भोपाळे यांनी  सतत अभ्यास, कठोर परिश्रम विद्यार्थी मंडळी साठी महत्त्वाचे आहेत  असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. एकनाथ मोरे यांनी   विद्यार्थ्यांचा  अभ्यासातील कल ओळखून पालकांनी त्यांच्या स्वप्नांना बळ दिले पाहिजे.  असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना माजी शिक्षण संचालक नांदेडे यांनी   गरीबी  यशाच्या आड येत नाही.फक्त सतत अभ्यास,प्रामाणिकपणा,विनम्रता अंगी बाळगून जिद्दीने परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हा यश हमखास मिळते  असे सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, प्रा. विजय भिसे, मुख्याध्यापक गोविंद बोदमवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे संघटक सूर्यकांत माली पाटील यांनी केले. तर आभार लक्ष्मण कांबळे यांनी मानले. दुपारी चार ते सायंकाळी 6 पर्यंत संपन्न झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे, देवराव सोनसळे, नारायण पांचाळ, पत्रकार शुभम डांगे, दौलत पांडागळे, रायवाडी येथील पांचाळ, मा.उपसरपंच राहुल सोनसळे , गंगाधर भिसे ,रूपेश भिसे , नारायण पांचळ , गावातील अभ्यासू विद्यार्थी आणि गावकरी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS