दलित पँथरचा 26 जानेवारीला शोले स्टाईल आंदोलनाचा इशाराबीड । प्रतिनिधीबीड शहरातील घरकुल योजनेचे हप्ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने

दलित पँथरचा 26 जानेवारीला शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा
बीड । प्रतिनिधी
बीड शहरातील घरकुल योजनेचे हप्ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेकडो गरीब कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. महागाई, वाढती मजुरी आणि साहित्य खर्चामुळे अनेक कुटुंबे आधीच कर्जबाजारी आहेत. अनेक घरकुल कामे अर्धवट अवस्थेत असून काही लोक आजही असुरक्षित घरांमध्ये राहत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाविरोधात दलित पँथर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांनी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले असून सर्व प्रलंबित हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, प्रशासनाने वेळेत काम केले नाही, तर 26 जानेवारी 2026 रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर शोले स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनामुळे उद्भवणार्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी प्रेम कांबळे, आकाश वाघमारे, विशाल जाधव, अरविंद ईनकर इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS