Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवली

मुंबई/प्रतिनिधी ः माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत बुधव

आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा
ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
शिवसेनेकडून महागाईच्या मुद्द्यावरून मोर्चाचे आयोजन… | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत बुधवारपासून जास्तीचा पोलिस फौजफाटा राहणार आहे. आदित्य यांची यात्रा बुधवारी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातल्या महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. त्यांनी पोलिस महासंचालकांना तसे पत्रही लिहिले आहे. त्यानंतर आदित्य यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

COMMENTS