Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्या बडेनरा मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी लढुन दाखवावं  – आ. रवी राणा  

अमरावती प्रतिनिधी - आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्

ग्रामीण भारताला सक्षम बनविण्याचे लक्ष्य : पंतप्रधान मोदी
ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद! | LokNews24
दिया कापर कंपनीत स्फोट होऊन दोन मजूरांचा मृत्यू . | LOKNews24

अमरावती प्रतिनिधी – आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभे राहावे. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे.ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी खासदार नवनीत राणांनी देखील त्यांना आव्हान दिले होते. की,  महाराष्ट्रामधुन उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणाहुन उभं रहावेत त्यांच्या विरोधात एका महिलेने उध्दव ठाकरे यांना आव्हान केले होते. मात्र ते त्यांनी स्विकारले नाही.   परंतु त्यावेळेस उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत. 

त्यावेळेस उध्दव ठाकरे कमी पडले. आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. बडनेरा मतदारसंघामधुन मी राजीनामा द्यायला तयार आहे.  मात्र मुख्यमंत्री तर दूरच आधी माझ्याशी निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवा असे खुले आव्हान आमदार रवी राणा यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात देखील मी उभं रहायला तयार आहे अशी प्रतिक्रिया आ.रवी राणा यांनी दिली.

COMMENTS