Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेंटल कॉलेज एनएसएस विद्यार्थ्यांचा दंडकारण्यात सक्रिय सहभाग

संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात पर्यावरण स

महिलांना शिक्षण देण्याचा महात्मा फुलेंचा निर्णय क्रांतीकारी होता
कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ
ओबीसी आरक्षण रद्द… बारा बलुतेदारांना फास.. l Lok News24

संगमनेर ः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या दंडकारण्य अभियान चळवळीत एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागीय वृक्षारोपण करून संवर्धनाची जबाबदारी घेतली
कर्‍हेघाट व परिसरात आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ. सुयोग तूपसाखरे, प्रा बाबा खरात, दशरथ वर्पे, श्रीराम कुर्‍हे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम कार्यक्रमा अधिकारी प्रा. पंकज जाधव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. एसएमबीटी डेंटल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने समाजकार्यात भाग घेतला आहे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोक चळवळ ठरली आहे या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दंतमहाविद्यालयाच्या 100 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वृक्षारोपण करून या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर समाजकार्याचे संस्कार दिले जातात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि एसएमबीटी डेंटल कॉलेजच्या समन्वयातून कर्‍हे घाट परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती अत्यंत महत्त्वाची असून आपल्या समाजामध्ये याबाबत अधिक प्रबोधन करण्याची जबाबदारी या युवकांनी घ्यावी असे आव्हान त्यांनी केले. तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासह आरोग्य शिबिरांमधून सातत्याने चांगले काम केले आहे. उच्च शिक्षणाबरोबर समाज शिक्षण हे एनएसएसच्या माध्यमातून मिळत असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक पाटील यांनी केले तर रासयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्रा बाबा खरात व इतरांनी गायलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.

COMMENTS