देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीने पुणे येथे इन्व्हेस्टिगेटर मीट 2023 चे आयोजन केले होते. मोटार वाहन अपघात दाव्यातील फसवणू
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीने पुणे येथे इन्व्हेस्टिगेटर मीट 2023 चे आयोजन केले होते. मोटार वाहन अपघात दाव्यातील फसवणूक थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. फसवणूक करणार्यावर दोषींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीने पुणे येथे इन्व्हेस्टिगेटर मीट 2023 ची बैठक पार पडली.
या बैठकीत मोटार अपघात दाव्या मध्ये कपंनीची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि असे गुन्हे थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विमा मिळावा म्हणून काहीजण खोटे दावे दाखल करतात.विमा रक्कम मंजुरीपूर्वी प्रत्येक दाव्याचा पोलीस आणि इतर सरकारी अधिकार्यांच्या मदतीने पुन्हा तपास करण्यात येणार आहे. खोटे दावे करणार्यावर कडक कार्यवाही केली जाईल असा ठोस निर्णय कपंनीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार महाराष्ट्रात डार ची अंमलबजावणी होण्यासाठी कंपनी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीसाठी कपंनीचे अधिकारी राधेगोपाल शर्मा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व ठोस निर्णय जाहिर केले. श्रीराम कंपनीकडून विशाल गुप्ता, अभिजित थोरात व महाराष्ट्रातील इन्व्हेस्टिगेटर आनंद वागदरीकर, निखिल सिंघम, एजाज अहमद, कुलदीप कुडचे, भास्कर वढावकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि इन्व्हेस्टिगेटरस उपस्थित होते.
COMMENTS