Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

बीड  प्रतिनिधी - बीड येथील घटना रमेश रामभाऊ कानडे बस चालक याने शेख इस्माईल बाषुमिया व त्याचा भाऊ शेख इब्राहिम बाशुमिया यांचे विरुद्ध शिवराज पान

संत निळोबाराय विद्यालयात ’शिक्षण सप्ताह’ सुरू
रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन
सचिव भांगे यांच्याकडून शासन निर्णयाला केराची टोपली

बीड  प्रतिनिधी – बीड येथील घटना रमेश रामभाऊ कानडे बस चालक याने शेख इस्माईल बाषुमिया व त्याचा भाऊ शेख इब्राहिम बाशुमिया यांचे विरुद्ध शिवराज पान सेंटर येथे शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या समोर बसला मोटार सायकल  आडवी लावून खाली ओढून हाणमार व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
दिनांक 25.2.2015 रोजी रमेश रामभाऊ कानडे हा बीड बस स्थानकातून त्याच्या ताब्यातील बस घेऊन नाळवंडी कडे प्रवास करत होता. शिवाजीनगर पोलीस चौकी समोर आली असता रमेश कानडे यांच्या बसला आरोपी शेख इस्माईल व शेख इब्राहिम या दोघांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल बसला आडवी लावली व रमेश कानडे यांच्या गचुरेला धरून खाली ओढून लाथा बुक्क्याने हाणमार करून शिवीगाळ केली. सदरच्या झालेल्या प्रकाराबद्दल रमेश कानडे यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाटले व आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून हाणमार व शिवीगाळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आरोपीच्या विरुद्ध कलम 353,332, 341, 504, 506 व 34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यांच्या विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. सदरील प्रकरणाची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटोदकर साहेब यांच्या न्यायालयामध्ये झाली.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी तर्फे एडवोकेट गणेश घुगे यांनी कामकाज पाहून आरोपीची भक्कम बाजू मांडली त्यामुळे सदर प्रकरणातील आलेला साक्षी पुरावा विश्वास दर्शक नसल्याने सदर आरोपातून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटोदकर साहेब यांनी शेख इस्माईल व शेख इब्राहिम यांची निर्दोष मुक्तता केली.

COMMENTS