Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : चोरीच्या उद्देशाने उच्चभ्रू मानल्या जाणार्‍या निगडी प्राधिकरण परिसरात शीतल विनय ओहोळ (वय 32) या महिलेची भर दुपारी हत्या करण्यात आली होती.

रेनबो स्कूलचा विद्यार्थी साईश गोंदकर याची सातासमुद्रापार भरारी
राज्यातील निवडणुका पावसाळ्यात की दिवाळीआधी ?
lonand : विवाहितेच्या आत्महत्येनंतर कोपर्डे तालुका खंडाळा येथे तणावाचे वातावरण.

पुणे : चोरीच्या उद्देशाने उच्चभ्रू मानल्या जाणार्‍या निगडी प्राधिकरण परिसरात शीतल विनय ओहोळ (वय 32) या महिलेची भर दुपारी हत्या करण्यात आली होती. आरोपी लक्ष्मण प्रभू वाघ याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ही घटना 2011 मध्ये घडली असून तब्बल 11 वर्षांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. आरोपी लक्ष्मणला पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी बाजू सरकारी महिला अ‍ॅडव्होकेट पाठक यांनी मांडली. संपूर्ण तपास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी केला. 26 ऑगस्ट 2011 रोजी पिंपरी-चिंचवडच्या निगडी प्राधिकरण येथे शीतल विनय ओहोळ यांची अज्ञात चोरट्याने चेहर्‍यावर आणि डोक्यात वार करून हत्या केली होती. घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या प्रकरणी काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण प्रभू वाघला बेड्या ठोकण्यात आल्या. तो शीतल यांच्या घरासमोरील महादेव मंदिरात बसून घराची टेहळणी करत असल्याचे तपासात पुढे आले. 2011 पासून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल काल सोमवारी लागला असून, यातील मुख्य आरोपी लक्ष्मण प्रभू वाघला वडगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल अकरा वर्ष हा खटला सुरू होता. अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

COMMENTS