Homeताज्या बातम्यासंपादकीय

तज्ज्ञांच्या मते, सत्ताबदल अटळच !

 लोकसभेच्या चौथ्या फेरीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर, देशभरातल्या सेफाॅलॉजिस्टांनी केलेल्या पाहणीतून, भाजप आणि एनडीए हे दोघेही बहुमताच्या आकड्यापा

ओबीसींवर अन्याय कराल, तर, परिणाम भोगाल ! 
संविधान महासभा आणि राहुल गांधी!
राज्याचा अग्रक्रम राखणे लोकांच्याच हातात !

 लोकसभेच्या चौथ्या फेरीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर, देशभरातल्या सेफाॅलॉजिस्टांनी केलेल्या पाहणीतून, भाजप आणि एनडीए हे दोघेही बहुमताच्या आकड्यापासून बरेच लांब राहतील, अशी शक्यता वर्तवली आहे! त्याचबरोबर इंडिया आघाडी नेमक्या किती  जागा घेईल, या सदर्भातील थोडा संभ्रम असला तरी, देशातील प्रादेशिक पक्षांचा मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेची स्थिती त्रिशंकू बनवत सत्ताअंकुश निर्माण करण्यात येईल, अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडे बहुमताच्या जवळपास किंबहुना बहुमत मिळेल एवढ्या जागा मिळतील, असा अंदाज सांगितला जात असला तरी, प्रादेशिक पक्षांची कामगिरी नेमकी कशी होते, यावर बरेच काही अवलंबून आहे, हे  चौथ्या टप्प्याच्या नंतर स्पष्ट होते. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात मात्र सर्व निवडणूक तज्ञांनी जी एक शक्यता व्यक्त केली आहे, ती शक्यता म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने खूप मोठी आणि ताकद असणारी बाब म्हणजे यावेळी तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे खाते उघडेल; असा एक प्राथमिक अंदाज तज्ञांनी केलेला आहे. त्यामध्ये डॉ. योगेंद्र यादव यांचा देखील समावेश आहे. ज्या तामिळनाडूचे राजकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर विषयाभोवतीच कायम राहिले आहे, त्यात तामिळनाडूमध्ये  ब्राह्मण नेतृत्व असलेल्या राजकीय पक्षांना, तेथील जनता थारा देत नाही, ही बाब स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूमध्ये चंचू प्रवेश करणे हे त्यांचे स्वप्न राहिले आहे हे स्वप्न पहिल्यांदा साकार होईल असे वाटते या निवडणुकीतून दिसते आहे अर्थात यासाठी तमिळनाडूच्या ज्या ब्राह्मणेतर साधूंना मोदींनी संसदेत नेले होते,

त्याचा एक प्रत्यक्ष परिणाम राजकीय निकालातून त्यांना मिळेल, असेच समीकरण दिसू लागले आहे. अर्थात, ही केवळ एक जागा असेल! परंतु, त्या ठिकाणी भाजपला एक जागा जरी मिळाली तरी तो विजय त्यांच्या इतर पराभवापेक्षा खूप मोठा असेल, यात मात्र शंका नाही! कारण, यातून पुढे ब्राह्मण नेतृत्वाचे पक्ष आणि तामिळनाडूतील ब्राह्मणेतर पक्ष यांच्यामधील सत्ता संघर्ष पुढील काळात निश्चितपणे तीव्र होईल. डीएमके, किंवा पेरियार रामस्वामी यांनी उभ्या केलेल्या चळवळीला जर भारतीय जनता पक्षाला एक जागा जरी मिळाली तरी ते अपयश ठरेल. या अपयशाला तमिळनाडूतील ओबीसी समुदायच जबाबदार असेल. ही बाब आता सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. याचाच अर्थ पेरियार आणि अण्णा दराई यांच्या विचारांना सुरुंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले का, असा प्रश्न निश्चितपणे उभा होतो. असो. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत मात्र पराभवाच्या छायेत उभा आहे आणि सत्ता बदलाचे संकेत हे निश्चित आहेत. असं भाकीत जवळपास सर्वच निवडणूक विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. जे प्रश्न लावून धरण्यात इंडिया आघाडीला यश मिळत आहे, ते म्हणजे बेरोजगारी, महागाई, आरोग्य आणि स्त्री सक्षमता या मुद्द्यांच्या भोवती इंडिया आघाडी आणि काँग्रेस हे सातत्याने राहिल्यामुळे, त्याचा एक परिणाम मतदानाच्या माध्यमातून दिसत आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुकांच्या घोषणा झाल्या त्यावेळी, कोणालाही हे वाटले नव्हते की या वेळेच्या निवडणुकीमध्ये एवढा फेरफार होईल. परंतु, प्रत्यक्ष निवडणुकांचे टप्पे सुरू झाल्यानंतर जनतेची मानसिकता या प्रश्नांभोवती एकवटली आणि त्याचा परिणाम भाजपचं मतदान घटण्यात झाला!भाजपासाठी मतदानालाच न बाहेर पडणं अशी भूमिका घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसून आली.

COMMENTS