कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक काग

कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि इतर कामासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत मिळत आहे. या शिबिराच्या माध्यमातून पात्र तळागाळातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने हीच खरी विकासाची ओळख आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील महादेव मंदिर सभामंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ शनिवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी त्या बोलत होत्या.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल आणि अन्य विषयक प्रश्नांचे मार्गदर्शन आणि निराकरण एकाच ठिकाणी होत आहे. अनेक वेळा महिलांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते किंवा माहितीच्या अभावामुळे त्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. परंतु या शिबिरामुळे प्रशासन थेट महिलांपर्यंत पोहोचत असल्याने यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, दुय्यम निबंधक पोपट कुसळकर, भूमी अभिलेख अधिकारी प्रमोद जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. मानसी तांबे, मंडळ अधिकारी शिल्पा राणे,ग्राम महसूल अधिकारी सौरभ धुमणे, दिनकर कातकाडे, बाळासाहेब कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS