Homeताज्या बातम्यादेश

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली प्रतिनिधी : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह  यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंत

यंदा महिनाभर आधीच केशर आंबा बाजारात
लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?
अदानी समूहाला ‘सर्वोच्च’ क्लीन चीट  

नवी दिल्ली प्रतिनिधी : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह  यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार सिंह यांच्या रुपाने याच प्रकरणात ही दुसरी अटक आहे. सिंग यांना अटकने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीतील व्यापारी दिनेश अरोरा यांचा उल्लेख केला आहे, दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण याच अरोरा यांनी माफीचा साक्षीसार होण्याचे मान्य केले आहे. संजय सिंह यांच्या उपस्थितीत अरोरा यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.

एका कार्यक्रमादरम्यान संजय सिंह यांची भेट झाल्याचे अरोरा यांनी सांगितले. संजय सिंह यांची भेट घेतल्यानंतर ते दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याही संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असा दावा ईडीने केला आहे. त्यानंतर आज संजय सिंह यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र चौकशीदरम्यान असहकार्य केल्याचे सांगत ईडीने सिंह यांना अटक केली आहे.

COMMENTS