भारत वर्षात हा स्थायीभाव आणि वेळ मारून नेण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या जगाच्या तुलनेत काकणभर सरस आहे.त्याचाच वापर लखीमपुर खीरी प्रकरणाच्या भव
भारत वर्षात हा स्थायीभाव आणि वेळ मारून नेण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या जगाच्या तुलनेत काकणभर सरस आहे.त्याचाच वापर लखीमपुर खीरी प्रकरणाच्या भवितव्याची दिशा ठरविण्यासाठी केला जात नसेल ना? अशी शंका येण्यास पुरेसे परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध आहेत.एरवी खूनासारख्या गंभीर आरोपावरून एखाद्या सामान्य संशयीतावर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्या संशयीताला घरातून खेचून बाहेर काढतात.ओढत ओढत पोलीस ठाण्यात आणून डांबून ठेवतात.तो घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर असेल नसेल याची कुठलीही शहनिशा न करता एफआयआर दाखल झाली की तात्काळ संशयीतांभोवती अटकेचे फास आवळले जातात.हीच भारतीय पोलीसींगची कार्यप्रणाली राहीली आहे.दुसऱ्या बाजूला लखीमपुर घटनेत संशयीत असलेल्या आशीष मिश्रा नामक संशयीतांसह पंधरा जणांवर भादंवि ३०२ सह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवस त्याला हात लावण्याची हिम्मत उत्तर प्रदेश पोलीसांनी दाखवली नव्हती.*लिड*
विस्मरण मानवी स्वभावाचा स्थायीभाव आहे.तो स्थायीभाव नजरेसमोर ठेवून मानवजातीतील चाणाक्ष जातकुळी अडचणीचे ठरणारे प्रसंगात वेळ मारून नेण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात.भारत वर्षात हा स्थायीभाव आणि वेळ मारून नेण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या जगाच्या तुलनेत काकणभर सरस आहे.त्याचाच वापर लखीमपुर खीरी प्रकरणाच्या भवितव्याची दिशा ठरविण्यासाठी केला जात नसेल ना? अशी शंका येण्यास पुरेसे परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध आहेत.एरवी खूनासारख्या गंभीर आरोपावरून एखाद्या सामान्य संशयीतावर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्या संशयीताला घरातून खेचून बाहेर काढतात.ओढत ओढत पोलीस ठाण्यात आणून डांबून ठेवतात.तो घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर असेल नसेल याची कुठलीही शहनिशा न करता एफआयआर दाखल झाली की तात्काळ संशयीतांभोवती अटकेचे फास आवळले जातात.हीच भारतीय पोलीसींगची कार्यप्रणाली राहीली आहे.दुसऱ्या बाजूला लखीमपुर घटनेत संशयीत असलेल्या आशीष मिश्रा नामक संशयीतांसह पंधरा जणांवर भादंवि ३०२ सह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवस त्याला हात लावण्याची हिम्मत उत्तर प्रदेश पोलीसांनी दाखवली नव्हती.कारण तो देशाच्या गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा आहे.ही आहे भारतीय लोकशाहीची समानता.लोकशाहीची दुसरी बाजूही आहे,या घटनेनंतर संशयीताला सत्ता पाठीशी घालत आहे,किंबहूना संशयीत निष्पन्न झाल्यानंतर देशाचे गृहखाते राज्य पोलीसांवर दबाव आणू शकते.ही बाब लक्षात घेऊन शेतकरी संघटना,काँग्रेस सपा सारख्या विरोधी पक्षांनी आशीष मिश्राच्या अटकेसाठी दबाव वाढवला.इकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायव्यवस्थेने स्वतः दखल घेऊन संशयीतांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.राज्य सरकारनेही स्वतंत्र एसआयटी स्थापन करून तपासाचे निर्दैश दिले.या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणून लखीमपूर खिरी मधल्या तिकोनिया इथे गाडीने शेतकऱ्यांना उडवल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला लखीमपूर पोलिसांनी अटक केली.12 तासांच्या चौकशीनंतर, शनिवारी रात्री लखीमपूर पोलिसांनी आशिषला अटक केली. एखाद्या खूनी संशयीताची चौकशी करण्याचा ऐतिहासीक विक्रम एसआयटीने या बारा तासात मोडला आहे,यापुर्वी सन २०१० मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तब्बल ९ तास एसआयटीने चौकशी करण्याचा विक्रम केला होता.सन २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंग्यांबाबत ही चौकशी झाली होती,तो विक्रम मोडूनही एसआयटीच्या हाती काही लागले नाही.आशीष मिश्रा चौकशीला सहकार्य करीत नसल्याचा आक्षेप घेऊन एसआयटीने त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली,बचाव पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय सरकारी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरू नये हा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आशीष मिश्राला न्यायालयीन कोठडी दिली.हा सारा शनिवार उत्तररात्रीपर्यंतचा घटनाक्रम. रविवारी सुटी आल्याने सोमवारी यावर न्यायालय आपला निर्णय देईल,पोलीस आशीषची कोठडी मागणार हे निश्चित असले तरी या घटनाक्रमातून अनेक प्रश्न उपस्थित झालेत,त्याची उत्तरे आगामी भविष्य काळात मिळतील याची कुठलीच शाश्वती नाही.आशीष मिश्राला अटक करण्यासाठी सुरूवातीला झालेली टाळाटाळ,दरम्यानच्या काळात गृहराज्यमंत्री असलेल्या पित्याचे वक्तव्य,त्या बारा तासात एसआयटीने सरकारी पाहुण्याची केलेली सरबराई या साऱ्या गोष्टी या प्रकरणात वेळ काढू धोरण स्वीकारत आशीष मिश्राला वाचविण्यासाठी केलेला अट्टाहासच निर्देशीत करीत आहे.या प्रकरणातून भाजपातील अंतर्गत मतभेदही प्रकर्षाने चव्हाट्यावर आले आहेत.योगी आणि मौर्य यांच्यातील सत्तेच्या वर्चस्वासाठी सुरू झालेले शितयुध्दही दुर्लक्षीत करता येणार नाही.आशीष मिश्राला अटक व्हावी ही योगींची इच्छा लपून राहीली नाही.अत्यंत विश्वासातील अति.पो.अधिक्षक अरूणकुमार यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन झाली तेंव्हाच योगींची इच्छा स्पष्ट झाली होती.गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना उडवल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरप्रमाणे आशिष मुख्य आरोपी आहेत. आशिषवर हत्या, हत्येचा प्रयत्न यासह अन्य कठोर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.लखीमपूर खिरीप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकाने याआधीही आशिषला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यासाठी नोटीसही बजावली होती. मात्र ते गैरहजर राहिले. दुसऱ्या नोटीशीनंतर शनिवारी तो पोलिसांसमोर हजर झाला.घटना घडली तेंव्हा आशीष घटनास्थळी नव्हता असे वक्तव्य वारंवार देऊन पिता गृहराज्यमंत्री अजय मिश्रा मुलाचा बचाव करीत आहेत.हे वक्तव्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तपास यंत्रणेवर दबाव वाढविणारे आहे.एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे मात्र संशयीत आशीषला देता आले नाहीत.भविष्यातही ती मिळतील अशी शाश्वती नाही.बाप गृहराज्यमंत्री असतांना त्याचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही.हा अहंकार कारणीभूत आहे.त्याचा प्रत्यय आशीष सोबत एसआयटी कार्यालयात आलेल्या चार सहकाऱ्यांच्या प्रसार माध्यमांना दिलेल्या वक्तव्यातून आला आहे.आम्ही येथे त्यांच्या सांगण्यावरून नाही तर आमच्या आटी शर्तींवर आलो आहोत,हे वक्तव्य हा अहंकारच दाखवतो.बाप गृहमंत्री असेल तर बेटा दोषी असला तरी फासावर जाईल कसा? आम्ही सत्ताधारी आहोत.आम्ही काहीही करू शकतो,देशाचा कायदा आम्हाला अडवू शकत नाही.आम्हाला वाटेल तेंव्हा आम्ही चौकशीला येऊ. आम्ही सांगू तेच प्रश्न विचारायचे.आम्ही सांगू तीच उत्तरे खरी मानायची.आसा अहंकार वाढविणारे मंत्रीपद संशयीताचे कवच कुंडले बनली असतांना बारा नाही चोवीस तास चौकशी करूनही दोष सिध्द करता येणार नाही.म्हणून मंत्रीपद काढून घेणे ही नैतिकता जागी व्हायला हवी.प्रश्न फक्त लखीमपुर घटनेपुरता मर्यादीत नाही,गृहमंत्र्यांवर अंतर्गत कायदासुव्यवस्थेसोबत सीमावर्ती सुरक्षेचीही जबाबदारी आहे.मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या लखीमपुरला नेपाळची सीमा लागून आहे,ही संवेदनशील बाबही लक्षात घ्यायला हवी.याचाच अर्थ या अटकेवर समाधान मानून निर्माण झालेला दबाव तसूभरही कमी होऊ न देता निष्पक्ष आणि तटस्थ चौकशी व्हावी यासाठी अजय मिश्रांच्या राजीनाम्यासाठी आणखी दबाव वाढवावा लागेल.
COMMENTS