Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीर बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड ः आ.आशुतोष काळे

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. रयतच्या माध्यमातून राज्या

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या
छ. संभाजीराजांचे शौर्य शत्रुला धडकी भरवणारे

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. रयतच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक व सामाजिक क्रांती झाली. त्यामुळे शिक्षण, उद्योग, आणि आर्थिक क्षेत्रात आज महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड होते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध रयत संकुलामध्ये डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त आ.आशुतोष काळे यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयत संकुलाच्यावतीने कोपरगाव शहरात रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर अण्णांचा विजय असो, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आदी जयघोषाने तसेच झांज व लेझीम पथकासह थोर महापुरुष, समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान करत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक,  एस.एस.जी.एम. महाविद्यालय, के.बी.पी माध्यमिक व प्राथमिक विद्यालय, सी.एम.मेहता कन्या विद्यालय व पद्मा मेहता विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS