अंबरनाथ प्रतिनिधी- अंबरनाथ(Ambernath) मध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडलीये. चिंचपाडा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झा
अंबरनाथ प्रतिनिधी- अंबरनाथ(Ambernath) मध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडलीये. चिंचपाडा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात सलमान शेख(Salman Sheikh) हा तरुण 12 ऑगस्ट रोजी रस्त्याने जात होता. यावेळी त्याला निषाद सय्यद(Nishad Syed) आणि सिद्दीक चौधरी(Siddique Chaudhary) या दोघांनी रस्त्यावर पाडून मारहाण केली. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला. मारहाण करणारा निषाद सय्यद याची आई झुलेखा सय्यद या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. मात्र या प्रकरणात राजकारणाचा काहीही संबंध नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झुलेखा सय्यद आणि बांधकाम व्यावसायिक नझीर शेख यांचे कौटुंबिक वाद असून सलमान या नझीर शेख यांच्याकडे काम करतो. त्याच वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय.
COMMENTS