सातारा प्रतिनिधी- दहीहंडी कार्यक्रमात एका अनोळखी युवकाने कोयता नाचवल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन संशयित यु
सातारा प्रतिनिधी- दहीहंडी कार्यक्रमात एका अनोळखी युवकाने कोयता नाचवल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील तालीम संघ मैदान या ठिकाणी छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने भव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातून उदयनराजे भोसले यांचे समर्थक या कार्यक्रम ठिकाणी आले होते. यावेळी एका घोळक्यात एका अनोळखी युवक कोयता नाचवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. यामुळे संबंधित अज्ञात युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
COMMENTS