Homeताज्या बातम्यादेश

गणपती मंडपात नाचता नाचता तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आंध्र प्रदेश प्रतिनिधी - सध्या हृदयविकाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल

माता भगिनी च्या डोक्यावरील हंडा उतरवणे हेच प्रथम कर्तव्य सरपंच करांडे
‘आश्रम’ फेम बबिता लवकरच अडकणार लग्नबंधनात
काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

आंध्र प्रदेश प्रतिनिधी – सध्या हृदयविकाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल्यातून निघून जात आहे. अनेकांचा जीममध्ये व्यायाम करताना देखील अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. नाचता नाचताही अनेकांचा जीव गेला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातूनही समोर आला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बेभान होऊन नाचता नाचता एकाने जीव गमावला आहे.आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाचता नाचता एक तरुण अचानक थांबतो आणि खाली कोसळता. त्यानंतर तो उठतच नाही. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. प्रसाद (वय 26 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम नगरात गणेश चतुर्थीनिमित्त मंडप सजवण्यात आला होता. तिथे प्रसाद त्याच्या एका मित्रासोबत बेभान होऊन नाचत होता. त्यानंतर अचानक तो खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी प्रसादला रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने प्रसादचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. डीजेच्या तालावर नाचताना एक व्यक्ती अचानक खाली कोसळली होती. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये तेलंगणातूनही अशीच बातमी समोर आली होती. नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या तरुणाचा डीजेवर नाचताना मृत्यू झाला होता. नाचताना तो तोंडावर पडला आणि पुन्हा उठला नाही.गणेश उत्सवादरम्यान बुरखा घालून नाचणाऱ्या तरुणाला अटक गणेश चतुर्थी उत्सवात बुरखा घालून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडूतील वेल्लोर येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी एक तरुण बुरखा घालून नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाईची केली आहे.

COMMENTS