औरंगाबाद प्रतिनिधी - सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंग

औरंगाबाद प्रतिनिधी – सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये घडली आहे. बिडकीन येथील ओमकार नारायण डांगरे हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे आई वडिल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबर वरुन ट्रॅक केले असता मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक १८ मध्ये धाव घेत विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली असता सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी १ तासाचे अथक परिश्रम घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर “I just feel like if I died everything will be ok:) ” अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
COMMENTS