Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत आढळला तुकडे केलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीमध्ये श्रद्धा वालकरनंतर मुंबईतील सरस्वती वैद्य या तरूणींच्या हत्या करून, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्ह

पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी
कोपरगाव शहरात तीन मुलांना कुत्र्यांनी घेतला चावा
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा : दादाजी भुसे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीमध्ये श्रद्धा वालकरनंतर मुंबईतील सरस्वती वैद्य या तरूणींच्या हत्या करून, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा विकृत प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये गीता कॉलनी भागात  तुकडे केलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी तुकडे तुकडे केलेल्या अवस्थेतला महिला मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी 18 मार्च 2023 या दिवशी दिल्लीतल्या गीता कॉलनी भागात एका विदेशी महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जवळपास चार महिन्यांनी तुकडे केलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांना बुधवारी सकाळी 9.15 च्या सुमारास ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पोलिस आता या घटनेबाबत माहिती घेत आहेत. मागच्या वर्षी दिल्लीतल्या महारौली भागात असेच एक प्रकरण समोर आले होते. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या प्रेताचे तुकडे महारौलीच्या जंगलात फेकले होते. त्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलेचा मृतदेह तुकडे तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला आहे. उत्तर जिल्हा डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की आम्हाला दोन तुकडे केलेला महिलेचा मृतदेह मिळाला आहे. गुन्हे शाखेचे पथक आणि एफएसएल यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. या महिलेचे वय 35 ते 40 वर्षे असावे असे कळते आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात आम्ही हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची ओळख अद्याप पटायची आहे. आम्ही जवळच्या परिसरात चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS