Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा 3 तुकडे केलेला मृतदेह आढळला

मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बेवारस बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडे

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात .
अपघातात कार चालक गंभीर जखमी
बाबा सिद्दिकींच्या हत्येत अनमोल बिश्‍नोईचा हात

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बेवारस बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे तुकडेही करण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडाळा परिसरात उभ्या असलल्या एका ट्रकच्या पाठीमागे काही लोकांना एक बेवारस बॅग दिसून आली. या बॅगेतून उग्र वास येत होता. त्यांनी तातडीने याबाबची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही बॅग उघडून बघितली असता एका महिलेचा मृतदेह जळालेला अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे तुकडे देखील करण्यात आले होते. पोलिसांनी मृत महिलेचे डोके, धड आणि एक पाय सापडला आहे, मात्र दुसरा पाय गहाळ आहे.मृत महिला ३० ते ३५ वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही. दरम्यान, हा मृतदेह येथे कुणी टाकला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या महिलेची हत्या एक ते दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

COMMENTS