बीड- बीड च्या सुशिक्षीत बेरोजगार तरुणाने कृषी मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. शुभम माने असं या तरूणाचे

बीड- बीड च्या सुशिक्षीत बेरोजगार तरुणाने कृषी मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. शुभम माने असं या तरूणाचे नाव असून तो माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील रहिवासी आहे. शुभम याने कृषी अभियंत्याचे शिक्षण पुर्ण केले असून तो सध्या वडोलोपर्जित शेती करत आहे. मात्र शेती मधील खर्च आणि शेतमालाला नसलेला दर याला कंटाळून त्याने कृषिमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शुभमने केलेल्या या मागणीमुळे सध्या त्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.
COMMENTS