Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नपत्रिकेद्वारे अवयवदान जनजागृतीचा अनोखा उपक्रम

औंध / वातांहर : मुलगा किंवा मुलीचे लग्न थाटात व्हावे, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा. लग्नातील पत्रिकेपासून तर ‘मेन्यू’ठरविण्यापर्यंत कुटुंबातील स

सातार्‍यातील पुढील वर्षीचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्याने : ना. शंभूराज देसाई
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील
चक्कर येवूनही चालकाचे प्रसंगावधान; बस शेतात घालून प्रवाशी सुरक्षित

औंध / वातांहर : मुलगा किंवा मुलीचे लग्न थाटात व्हावे, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा. लग्नातील पत्रिकेपासून तर ‘मेन्यू’ठरविण्यापर्यंत कुटुंबातील सदस्य अनेकदा विचार करतात. लग्नपत्रिका जेवढी महाग तेवढे थाटात लग्न, असा समजही आता सर्वमान्य झाला आहे. पण लग्नपत्रिकेद्वारे सामाजिक संदेश व जनजागृती करता येते, हा समज न समजण्यापलीकडचाच आहे.
पण हा समज दूर करून समाजभान राखणार्‍या वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रामधे कार्य करणार्या अविनाश काशीद यांनी चक्क लग्नपत्रिकेद्वारे अवयवदान जनजागृती, माझी वसुंधरा, सेंद्रीय शेती काळाची गरज, लेक वाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा याविषयी जनजागृती केली आहे. या पत्रिकेमुळे समाजाप्रती आपणही काही देणे लागतो याचे भान पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
शनिवारी अविनाश काशीद यांचे लग्न आहे. त्यांनी नातेवाइक व मित्रपरिवाराला त्यांनी पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले. ही लग्नपत्रिका बघून अनेकांना आश्‍चर्याचा व तेवढाच सुखद धक्का बसला. अवयवदान जनजागृती यासंदर्भात अवयवदान म्हणजे काय, अवयव प्रत्यारोपण/प्रतीरोपण, कोणत्या अवयवांचे दान करु शकतो. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबतच लेक वाचवा, पाणी आडवा पाणी जिरवा, माझी वसुंधरा व सेंद्रीय शेती काळाची गरज असा सामाजिक संदेश या पत्रिकेत आहेत. या लग्नप्रत्रिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अनेकांनी या सामाजिक संदेशाचे कौतुक केले आहे. अविनाश काशीद हे वैद्यकीय व पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वीही अवयवदान सर्वश्रेष्ठ दान, अवयवदान अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण, अवयवदान सर्वश्रेष्ठ दान, अवयवदान जनजागृती काळाची गरज याविषयी विविध माध्यमातून लेख प्रसिध्द झाले आहेत. तसेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दररोज अपघाताने शेकडो लोकांचा मृत्यू होतो. यानंतर परंपरेने अग्निसंस्कार अथवा दफन विधी केला जातो. परंतू जर योग्यप्रकारे कुटुंबीयांचे सपुपदेशन करुन मयत व्यक्तीचे वैद्यकीय नियमानुसार अवयवदान केल्यास निश्‍चितच गरजू रुग्णांचा जीव वाचू शकतो. या हेतुनेच लग्नपत्रिकेचा मागील भाग कोरा असतो. या भागाचा सामाजिक संदेश व जनजागृतीसाठी वापर करण्याचा विलासराव आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला. या संदेशाने एक जरी जीव वाचला तरी ही जनजागृती निश्‍चितच फायदेशीर होईल.

COMMENTS