Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी युवकास मारहाण

गुन्हा दाखल करण्याची एकलव्य संघटनेची मागणी

निमगांवखैरी/प्रतिनिधी ः बाजाठाण ता. वैजापूर येथील युवक अमोल पोपट निकम यास टाकळीभान येथील काही नागरीकांनी लहान मुलांची तस्करी करणारा संबोधुन मारहा

अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर
कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…
बेपत्ता मुलीच्या आईने केला आत्मदहनाचा प्रयत्न

निमगांवखैरी/प्रतिनिधी ः बाजाठाण ता. वैजापूर येथील युवक अमोल पोपट निकम यास टाकळीभान येथील काही नागरीकांनी लहान मुलांची तस्करी करणारा संबोधुन मारहाण केली तसेच त्याच्या बॅगमधील नवे कपडे आणी 39 हजार 500 रुपये रोख रक्कमही लंपास केली. तसेच टाकळीभान येथील पोलिस चौकीत आणुन मारहाण केली. या सर्वांवरच अँट्रासिटी अंर्तगत गुन्हा दाखल करण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल न केल्यास टाकळीभान गावात आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने दिलेला आहे. दरम्यान या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भालेराव, जिल्हा संघटक लक्ष्मण साठे, टायगर फोर्स जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सुरशे, युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बर्डे, युवा तालुकाध्यक्ष लहानु मोरे, युवा तालुका सचिव बबन आहेर आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका पोलिस ठाणे, तहसील, प्रांत, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांना देण्यात आले आहे.

COMMENTS