Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुशांत घोडके यांना वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार-2019 कोपरगाव येथील

शरद पवारांना मी मोठं मानत नाही, तुम्ही कोणी मानत असाल तर तुमचा प्रश्न; गोपीचंद पडळकरांची टीका l LokNews24
सत्यजीत तांबेंचा काँग्रेससह थोरांताना दे धक्का !
डॉ. रामदास आव्हाड यांची आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार-2019 कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण, वस्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आला आहे. पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्र येथे विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पंचाहत्तर हजार रुपये असे या पूरस्काराचे स्वरूप आहे. वनश्री सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित आहे. या प्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव, महसूल व वनविभाग प्रधान सचिव(वने) बी.वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.सुनीता सिंग, विभागिय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) अमोल थोरात, वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) हनुमंत धुमाळ, पुणे येथील विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांची वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अनेकांचे ते प्रेरणास्रोत आहे .त्यांना कलाउपासक, समाजरत्न, नाट्य मंदार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय प्रथम एकाच वेळी घोषित झालेले अहमदनगर जिल्ह्यातील ते पहिले व्यक्ती ठरले आहे. शिर्डी उपविभागात त्यांचे पर्यावरणावर उल्लेखनीय कार्य आहे.

COMMENTS