पुणे ः काही दिवसांपूर्वी बारामतीजवळ शिकाऊ विमान कोसळल्यानंतर पुन्हा एकदा रविवारी बारामतीतील कटफलजवळील शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने या दुर्
पुणे ः काही दिवसांपूर्वी बारामतीजवळ शिकाऊ विमान कोसळल्यानंतर पुन्हा एकदा रविवारी बारामतीतील कटफलजवळील शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेड बर्ड कंपनीचे हे विमान आहे. शिकाऊ पायलट हे विमान चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आठवडाभरातील विमान दुर्घटनेची ही दुसरी घटना आहे. अपघातात विमानाच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर विमान उलटे झाले आहे. आजच्या अपघातात नेमके कारण काय याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. विमान अपघातात पायलट जखमी झाल्याची माहिती आहे. बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. मात्र मागील काही दिवसात ही पाचवी दुर्घटना असल्याने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या दुर्घटनांचं नेमंक कारण काय याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.
COMMENTS