Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकची अश्लीलता चव्हाट्यावर ! कॉफी शॉप मध्ये तरुण तरुणींना प्रायव्हसी 

लोकमंथन प्रतिनिधी -  कॉलेज रोड, गंगापूर रोडसह गोदावरी नदीकाठावील आठ कॅफेवर बुधवार रोजी सील करण्यात आले आहेत. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे कॅ

सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात सुरु : ना. शंभूराज देसाई
आमचे हात बांधले नाही ,आम्हालाही दगड हातात घेता येतो – राज ठाकरे
जावळीच्या ओझरे शाळेला भारत सरकारचा स्वच्छ विद्यालयाचा दुसरा पुरस्कार जाहीर

लोकमंथन प्रतिनिधी –  कॉलेज रोड, गंगापूर रोडसह गोदावरी नदीकाठावील आठ कॅफेवर बुधवार रोजी सील करण्यात आले आहेत. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे कॅफेचालक आणि प्रेमवीरांचे मात्र धाबे दणाणले आहेत. सिन्नर येथील तीन कॅफेंमध्ये सोमवारी लैंगिक अत्याचार होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मंगळवारी शहरातील इंदिरानगर हद्दीतील चार कॅफेंवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. या कारवाईनंतर शहरातील सर्वच कॅफे महापालिका आणि पोलिसांच्या रडारवर आले आहेत.शहरात एमडी ड्रग्जचा राज्यातला सर्वांत मोठा कारखाना उद्ध्वस्त झाल्यानंतर नाशिक नशेचे नवे हब बनले आहे. या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार ललित पानपाटील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर हे प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. हे प्रकरण शमत नाही तोच शहरात कॅफेंच्या नावाखाली अश्लील ता  सुरू असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कॉलेज रोड, गंगापूर रोड भागात बुधवारी सायंकाळी अचानक काही कॅफेंवर धाड टाकण्यात आली. यात आठ कॅफेंमध्ये ‘अय्याशी’च्या अनेक सुविधा आढळल्याने यंत्रणाही चक्रावली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ही कारवाई केली आहे. कॅफेंमध्ये केवळ अमली पदार्थच नव्हे, तर सिगारेट, तसेच अनधिकृतपणे हुक्कादेखील उपलब्ध करून दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

COMMENTS