इराकची राजधानी बगदाद(Baghdad) मध्येही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराकमध्ये अराजकता माजली आहे. संतप्त आंदोलकांनी श्रीलंकन नागरिकांप्रमाणेच इ
इराकची राजधानी बगदाद(Baghdad) मध्येही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराकमध्ये अराजकता माजली आहे. संतप्त आंदोलकांनी श्रीलंकन नागरिकांप्रमाणेच इराकच्या राष्ट्रपती भवन आणि सरकारी भवनांत घुसखोरी केली आहे. त्यांना रोखण्यास सुरक्षा रक्षकानांही अपयश आलं आहे. श्रीलंकेनंतर आता इराकमध्येही अराजकता माजली आहे. देशात गेल्या १० महिन्यांपासून सरकार अस्तित्वात नाहीये. तसंच, शक्तिशाली शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सदर यांनीही राजकारणातून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं त्यांचे समर्थक संतप्त झाले आहे. नागरिकांनी राष्ट्रपती भवनात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे. त्यांच्यात आणि ईराण समर्थक इराकियांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गोळीबाराच्या घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. इराकची राजधानी बगदादमध्येही अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. संतप्त जमावाने श्रीलंकेप्रमाणेच राष्ट्रपती भवन आणि सरकारी भवनावर ताबा मिळवला आहे. जमावातील काही जण राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये उतरले आहेत. हे लोकं मुक्तदा अल- सदरचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. सोमवारी मुक्तदा अल सदर यांनी राजकारणातून सन्यास घेण्याची जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बगदादच्या रस्त्यांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
COMMENTS