Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन आव्हाने स्वीकारणारा शिक्षक तयार व्हावा ः डॉ. प्रशांत दुकळे

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शेवगाव येथे 2 जून 2024 वार रविवार रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात बी.एड. द्वितीय वर

कुळधरणच्या पालखी उत्सवात भाविकांची गर्दी
28 वर्षांनी पुन्हा भरली इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा
संसदरत्न खा.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ॲड.प्रतापराव ढाकणे सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा सोमवारी युवा संवाद अभियानाचा समारोप

शेवगाव तालुका ः आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शेवगाव येथे 2 जून 2024 वार रविवार रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात बी.एड. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रशांत दुकळे यांनी सांगितले की, वर्तमान स्थितीत संस्कारक्षम व नवनवीन आधुनिक आव्हाने स्वीकारणारा शिक्षक तयार होणे ही काळाची गरज आहे व तसे  प्रयत्न महाविद्यालय करत आहे. याबद्दल समाधानही व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर खिल्लारे, प्रा. भगवान,बारस्कर, प्रा. राजेंद्र बांगर, कार्यक्रमाच्या संयोजिका श्रीम.  स्मिता नाईक आणि विद्यार्थी प्रतिनिधी कल्याणी अन्नदाते हे उपस्थित होते.
           कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकेतून थोडक्यात उद्देश महाविद्यालयातील प्रा. स्मिता  नाईक यांनी व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थी मनोगते वाघमारे अनुसया, खेडकर गीतांजली, लांडे अक्षय, शेख नफिया, नेहूल विद्या, फलके आरती, वावरे कार्तिक, काकडे प्रमोद, दाणे हर्षदा, यांनी व्यक्त केले.  आपल्या मनोगतात विविध भावपूर्ण अनुभवातून विद्यार्थ्यांनी गत दोन वर्षातील आठवणींना  उजाळा दिला. यानंतर भगवान बारस्कर व राजेंद्र बांगर यांनी आपले प्राध्यापक मनोगत व्यक्त केले.  प्रा. बारस्कर यांनी सांगितले की दोन्ही वर्षातील प्रत्येक गोष्ट हे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडवण्यासाठीच केले जाते.  प्रा. बांगर यांनी देखील विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सुधीर खिल्लारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना नियमित कोर्स पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार निर्मिती होते यात तिळमात्र शंका नाही असे मत व्यक्त केले. यानंतर बी. एड.  द्वितीय वर्षातील सर्वच उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. शिवाजीराव काकडे लिखित आबासाहेब आणि मी या पुस्तकाचा प्रती  सस्नेह भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र बांगर यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा दाणे  व कु.  विद्या नेहुल यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी आणि बी.एड प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS