Homeताज्या बातम्यादेश

खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट

केरळ- केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याने 76 वर्षीय व्यक्

मूलभूत प्रश्‍न सोडवा अन्यथा आंदोलन ः हर्षदाताई काकडे
हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत
डायरी हा काही पुरावा असू शकत नाही- राऊत

केरळ- केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याने 76 वर्षीय व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इलियास हे 70 वर्षीय वृद्ध मारोट्टीचाल येथील एका हॉटेलमध्ये चहा पीत होते. यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल फोनने अचानक पेट घेऊन त्याचा स्फोट झाल्याने ते चांगलेच हादरले. स्फोटाचा आवाज ऐकताच इलियास यांनी खिशातील फोन काढून जमीनीवर फेकला. मात्र या दरम्यान त्यांच्या शर्टाने पेट घेतला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच शर्टाची आग नियंत्रीत केल्याने इलियास हे बालंबाल बचावले. इलियास यांनी एका वर्षापूर्वी त्रिशूर येथील एका दुकानातून एक हजार रुपयाला हा फोन विकत घेतला होता. सामान्य की पॅडवर काम करणाऱ्या फोनचा स्फोट झाला आहे. फोनची बॅटरी निकामी होणे हे स्फोटाचे कारण असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वर्तवण्यात येत आहे

COMMENTS