कल्याण डोंबिवली परिसरात थर्टी फास्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात

Homeताज्या बातम्याशहरं

कल्याण डोंबिवली परिसरात थर्टी फास्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात

कल्याण प्रतिनिधी-  कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर यावर्षी नववर्षाचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरा च

कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी
उद्याच्या महाराष्ट्रासाठी समाजसुधारकांची फळी निर्माण होणे आवश्यक : आमदार आशिष शेलार
संत गोदड महाराजांच्या नगरीत अतिरेक चालत नाही : आ. प्रा. राम शिंदे

कल्याण प्रतिनिधी–  कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर यावर्षी नववर्षाचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. रात्री उशिरा चालणाऱ्या पार्ट्या तसेच महिलांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण डोंबिवलीतील पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली असून यंदा महिलांच्या सुरक्षेसाठी 16 महिला पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनानंतर आता यावर्षी मोठमोठ्या आस्थापनांनी हॉटेल, हॉल अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याठिकाणी महिलांची सुरक्षितता महत्वाची असून  सार्वजनिक व खासगी ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी हे महिला पोलीस गस्त घालत लक्ष ठेवनार आहे. 

COMMENTS