Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विना अपघात सतत पंचेवीस वर्षे सेवा करणार्‍या पस्तीस बस चालकांचा सपत्नीक विशेष गौरव समारंभ बीड येथे संपन्न

राज्य परिवहन महामंडळ बीड विभागाचा स्तुत्य उपक्रम

केज प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राष्ट्रीय परिवहन बीड विभागाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्धापन दिन आणी स्वातंत्र्य दिनानिमित्त

वर्ल्ड बॉक्‍सिंग चॅम्पियनशिपसाठी पुण्यातील आकाश गोरखाची निवड
पुण्यात एमपीएससीच्या नव्या पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुब्रमण्यन

केज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राष्ट्रीय परिवहन बीड विभागाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्धापन दिन आणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विना अपघात पंचेवीस वर्ष सेवा करणा-या पस्तीस बस चालकांचा सपत्नीक विशेष गौरव समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बीड तालुक्यातील नेकनूर जवळील कळसंबर या गावचे श्री.बळीराम नामदेव धन्वे हे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय परिवहन महामंडळ विभागात चालक म्हणून भरती झाले.त्यांची सुरुवातच अत्यंत खडतर आणी कठीण अशा कोकण विभागात झाली. या विभागात त्यांनी बारा वर्षे सुरुळीत आणी सुरक्षित सेवा केली. त्यानंतर त्यांची बदली बीड विभागात झाली.या ठिकाणी देखील तेरा वर्षे त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले.तसे पहायला गेले तर बस चालकाची नौकरी म्हणजे अतिशय कठीण आहे. कारण बस चालवताना त्या चालकाचे पुर्ण लक्ष हात,पाय,डोळे सावधपणे एकत्र काम करतात.त्या एकट्याच्या जिवावर बसमधील पन्नास ते पंचावन्न प्रवाशांचे जीव एकट्या चालकाच्या हातात असतात.या विभागात पगार कमी मात्र सेवा जास्त अशी आहे. अशी खडतर नौकरी त्यांनी पंचेवीस वर्षे केल्याने या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पंचेवीस वर्षे विनाअपघात सेवा केल्यामुळे राष्ट्रीय परिवहन बीड विभागाच्या वतीने श्री.बळीराम नामदेव धन्वे यांच्यासह पस्तीस बस चालकांचा सपत्नीक विशेष गौरव करण्याचे निश्चित करुन अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून हा विशेष गौरव समारंभ बीड येथे 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.यावेळी बीड विभागाचे जिल्हा नियंञक मोरे सर यांनी बसचालक श्री.बळीराम नामदेव धन्वे आणी त्यांच्या पत्नी सौ. कमल बळीळाम धन्वे यांचा सपत्नीक विशेष गौरव केला.यावेळी त्यांना पंचेवीस हजार रुपयाचा धनादेश,सम्मानपत्र व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.हासन्मान त्यांच्या सेवापुर्ती नंतर करण्यात आला.या सोहळ्या प्रसंगी त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणी सुन सौ. समिधा हे देखीलउपस्थित होते.सत्कारमुर्ती श्री. बळीराम धन्वे व सौ. कमल धन्वे हे लोकनायक चे पत्रकार महादेव काळे यांचे बहिण आणी मेव्हणे आहेत.बीड विभागाने घेतलेल्या या विशेष गौरव सोहळ्यामुळे बीड विभागाचे सर्वत्र कौतुक होत असुन या कार्यामुळे सद्या कर्तव्यावर असणार्‍या चालकांसाठी ही एक प्रेरणा असल्याचे बोलले जात आहे.तर सर्व सन्मानित केलेल्यापस्तीस परिवाराकडून राज्य परिवहन बीड विभागाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS