Homeताज्या बातम्यादेश

किरकोळ महागाईत किंचित घट

नवी दिल्ली : देशभरात अन्नधान्यांच्या किंमतीसह भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या असून, महागाई रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान असतांना, महागाईपासून किंचित

पाकिस्तानात चालत्या बसला भीषण आग, 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
किर्गिस्तानमध्ये उसळला हिंसाचार
 कल्याण डोंबिवली परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडी 

नवी दिल्ली : देशभरात अन्नधान्यांच्या किंमतीसह भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या असून, महागाई रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान असतांना, महागाईपासून किंचित दिलासा मिळतांना दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किरकोळ महागाईत घट नोंदवण्यात आली आहे.  
जुलै महिन्याचा किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्याच्या 7.44 टक्क्यांच्या तुलनेत 6.83 टक्के इतका राहिला. टोमॅटोच्या भावाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कहर केला होता. 150 ते 200 रुपये किलो दराने विकला गेल्याने टोमॅटोला सोन्याचा भाव आला होता. याच काळात भाज्यांचे दरही गगनाला भिडले होते. पण ऑगस्टच्या शेवटी टोमॅटोचा भाव नियंत्रणात यायला लागला त्यामुळं किरकोळ महागाईत घट नोंदवली गेली आहे. दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये खाद्य महागाईचा दर 11.51 टक्क्यांहून 9.94 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ग्रामीण भागातील महागाईचा दर 7.63 टक्क्यांवरुन 7.02 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शहरी महागाईचा दर 7.20 टक्क्यांहून 6.59 टक्क्यांवर पोहोचला. कोअर अर्थात सर्वसामान्य महागाईच्या दरातही घट झाली असून तो 4.9 टक्क्यांवरुन 4.8 टक्क्यांपर्यंत किरकोळ खाली आला आहे.

COMMENTS