Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरच्या संदलमध्ये झळकले औरंगजेबाचे पोस्टर

भिंगार पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात रविवारी (दि.4) रात्री दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस  मिरवणुकीमध्ये मुघल सम्र

व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे नागरिक ठरता आहे बळी ः विवेक कोल्हे
गोदावरी दूध संघातील वाहन चालकांसाठी प्रशिक्षण
नेवाशात विठ्ठल रुख्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात रविवारी (दि.4) रात्री दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस  मिरवणुकीमध्ये मुघल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक झळकावण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, फकीरवाडा परिसरात रविवारी (दि.4) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस  मिरवणुकीमध्ये यातील चौघांनी संगनमताने मुगल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करुन ‘बाप तो बाप  होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा  देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे. या फिर्यादीवरून  भिंगार कॅम्प पोलिसांनी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा अ.नगर), अफनान आदिल शेख उर्फ खडा (रा.वाबळे कॉलनी अहमदनगर), शेख सरवर (रा.झेंडीगेट अ.नगर), जावेद शेख उर्फ गब्बर (रा.आशा टॉकीज चौक अ.नगर) यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 505 (2), 298, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या चार ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलिस करीत आहे.

दरम्यान, अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

… तर, त्याला माफी मिळणार नाही ः उपमुख्यमंत्री फडणवीस – अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकल्यानंतर या संदर्भात बोलतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. या देशात, या महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोणीही औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी मिळणार नाही.

COMMENTS