Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन

पोलिस अधीक्षक ओला यांचा पुढाकार

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे रहदारी वाढत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी सध्या जिल्ह्यातील

कर्जत-जामखेडमध्ये प्रशासन सुस्त
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताच्या सचिन भट्टड यांची निवड
सविता पिसाळ यांना पीएच.डी. पदवी

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे रहदारी वाढत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी सध्या जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन शहरातच वाहतूक शाखा अस्तित्वात आहे. आता जिल्हास्तरावर नव्याने जिल्हा वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अधीक्षक राकेश ओला यांनी केलेल्या बदल्यांमध्ये पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांची जिल्हा वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच या विभागाला आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील. शाखेचे कामकाज व जबाबदार्‍या निश्‍चित करून लवकरच जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय कार्यान्वित करण्यात येणार आहे.

नगर शहर, शिर्डी वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस व जिल्हा वाहतूक शाखा यांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही अधीक्षक ओला यांनी सांगितले.

COMMENTS