Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाईन फ्लू व कोरोना बाधित रुग्णांची तातडीने माहिती द्या

मनपाचे ख़ासगी रुग्णालयांना आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व आयएलआय, स्वाईन फ्लू (एच 3एन 2) व

नगरवासियांना खूष खबर…मध्य शहरातील पाच रस्त्यांचे होणार डांबरीकरण
महानगरपालिकेच्या तोफखा jbना लसीकरण केंद्रावर गोंधळ l LokNews24
नागरी प्रश्‍न सोडविण्यात महापालिकेला अपयश का ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व आयएलआय, स्वाईन फ्लू (एच 3एन 2) व कोरोना बाधित रुग्णांची माहिती मनपाच्या आरोग्य विभागास तात्काळ कळवावी व ही माहिती कळविणे बंधनकारक आहे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवकाचा मंगळवारी इन्फ्लूएंझा (एच 3एन 2) संसर्गामुळे नगरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बुधवारी आयुक्त डॉ. जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड व स्वाईन फ्ल्यु (एच 3 एन 2) या आजाराच्या नियंत्रणासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मिलिद पोळ, सचिव डॉ. अमित करडे, बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन वहाडणे, शहरातील सर्व आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त जावळे म्हणाले की, आयएलआय, स्वाईन फ्ल्यू (एच3एन2) व कोरोना हे विषाणूमुळे होणारे आजार आहेत. हे विषाणू हवेमार्फत पसरत असल्यामुळे याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला श्‍वासोच्छवासाद्वारे होतो. ताप येणे, खोकला, घसा खवखवणे व दुखणे ही या आजाराची सर्वसाधारण लक्षणे आहेत. तसेच अतिसार, उलट्या होणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे आदी तीव्र स्वरुपातील लक्षणे आहेत. नागरिकांनी लक्षणे आढळ्यास डॉक्टरांकडून औषधोपचार करुन घ्यावेत. हस्तांदोलन अथवा आलिंगन टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे-खोकणे-शिंकणे टाळणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, संसर्गग्रस्त रुग्णास भेटणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे आदी गोष्टी टाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अँटीजन तपासणी करून घ्या – ज्या नागरिकांना ताप येणे, खोकला, घसा खवखवणे व दुखणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे असतील, त्यांनी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात अँटीजन तपासणी करुन उपचार घ्यावेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये. लक्षणे आढळून आल्यास जवळच्या नागरी आरोग्य केंद्र अथवा जिल्हा रुग्णालय येथे योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहनही आयुक्त डॉ. जावळे यांनी केले आहे.

COMMENTS