Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्मवीर संभाजीराजे शक्तीज्योत शौैर्य यात्रा

येत्या रविवारपासून तीन दिवस विविध कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी ः धर्मवीर श्रीछत्रपती संभाजी महाराजांच्या 335व्या बलिदान दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे शक्तीज्योत शौर्य यात्रा-2023 उपक्रम होण

आम्हाला काम द्या…नाहीतर आर्थिक मदत द्या ; विडी कामगारांची प्रशासनाकडे मागणी
हुकूमशाही रोखण्यासाठी काँग्रेसचा लढा ः बाबा ओहोळ
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः धर्मवीर श्रीछत्रपती संभाजी महाराजांच्या 335व्या बलिदान दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे शक्तीज्योत शौर्य यात्रा-2023 उपक्रम होणार असून, या ही यात्रा पेडगाव (धर्मवीर गड) ते वढू बुद्रुक-तुळापूरपर्यंत जाणार आहे. यानिमित्ताने रविवारी (19 मार्च) ते मंगळवारी (21 मार्च) असे तीन दिवस विविध उपक्रम पेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर), टाकळी भीमा (ता. शिरूर, जि. पुणे) व वढू बुद्रुक-तुळापूर येथे होणार आहेत.

श्रीगोंदा व शिरूर तालुका शक्तीज्योत शौर्य यात्रा संयोजन समितीद्वारे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालय (श्रीगोंदा), छत्रपती संभाजी विद्यालय (पेडगाव), प्राथमिक शाळा (पेडगाव), वारकरी संघ (श्रीगोंदा तालुका), व्यसनमुक्त युवक संघ (महाराष्ट्र), मास्टर माईंड करियर अ‍ॅकेडमी (नगर), शिवदूर्ग संवर्धन समिती (पुणे), शिवदूर्ग ट्रेकर्स (श्रीगोंदा), टीम धर्मवीर गड, पेडगाव ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ (श्रीगोंदा) आदी विविध संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

तीन दिवस कार्यक्रम

रविवारी 19 मार्च रोजी पहाटे पाच वाजता पेडगावच्या धर्मवीर गड येथे शौर्यस्तंभाचे शासकीय पूजन व रक्तदान उपक्रम होणार असून, सायंकाळी 6 वाजता जगन्नाथ शिंदे (सातारा) यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवारी 20 मार्चला सकाळी 6 वाजता पेडगाव ते टाकळी भीमापर्यंत शौर्य ज्योतीचा प्रवास सुरू होणार आहे. ही यात्रा टाकळी भीमा येथे मुक्काम करणार असून, येथे रात्री 8.30 वाजता तानाजी पांडुळे (इंदापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी 21 मार्चला सकाळी 6 वाजता टाकळी भीमा येथून वढू बुद्रुक-तुळापूरकडे शौर्यज्योत प्रस्थान ठेवणार आहे. सकाळी 9 वाजता वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधीचे पूजन होणार असून, सकाळी 10 वाजता तुळापूर येथील महाराजांच्या बलिदान स्थळास अभिवादन केले जाणार आहे. येथे राजांच्या बलिदानाचे साक्षीदार असलेल्या साखळदंडाची पूजा होणार आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांचे व्याख्यान होणार असून, दुपारी 12 वाजता बलिदानस्थळी पुष्पवृष्टी होणार आहे. या शक्तीज्योत शौर्य यात्रेत व्यसनमुक्त युवक संघाचे प्रमोद भापकर, बाळासाहेब शेरेकर, मारुती शेळके, सागर पवार, अमोल सायंबर आदी सहभागी होणार आहेत. या धर्मवीर संभाजीराजे शक्तीज्योत शौर्य यात्रा-2023 उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे या यात्रेत सहभागी होण्यासाठी मारुती शेळके (9420752245) व बाळासाहेब खेडकर (9423824949) यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS