Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘नागिन’ फेम मधुरा नाईकवर दु:खाचा डोंगर कोसळला

इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धामध्ये तिने आपल्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तिंना गमावलंय

मुंबई प्रतिनिधी - पॅलेस्टिनी आणि इस्राइलमधील तणाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या युद्धामध्ये दोन्ही राष्ट्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून

संत जनार्दन स्वामी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम
भारताकडून जागतिक सहकार चळवळीला नवा आयाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी
चिनी सैनिकांना लष्कराने घेतले ताब्यात (Video)

मुंबई प्रतिनिधी – पॅलेस्टिनी आणि इस्राइलमधील तणाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या युद्धामध्ये दोन्ही राष्ट्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अशातच ‘नागिन’ फेम मधुरा नाईकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुराने इस्रायल-पॅलेस्टिनी युद्धामध्ये तिने आपल्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तिंना गमावलंय. अशा अचानक एक्झिटने तिच्यासह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर करत बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबद्दलची माहिती दिली. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मधुरा नाईक इस्त्रायलला पाठिंबा देत असून बहिणीच्या आणि भाऊजींच्या जाण्याचे दुःख व्यक्त करते. मधुरा नाईकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओसोबतच मधुरा नाईकने एक भावूक पोस्ट सुद्धा शेअर केलेली आहे. अभिनेत्री व्हिडीओमध्ये म्हणते, “मी मधुरा नाईक आहे, माझा भारतात एका ज्यू कुटुंबीयामध्ये जन्म झाला. सध्याच्या घडीला भारतामध्ये ज्यू धर्मियांची संख्या जेमतेम ३००० पर्यंतच आहे. ७ ऑक्टोबरच्या आधी आम्ही आमच्या कुटुंबातला एक मुलगा आणि एक मुलगी गमावली. माझी बहिण ओडाया आणि तिच्या पतीचा मृत्यू तिच्या दोन मुलांच्या समोर झाला. त्यांच्या मुलांच्या समोरच त्या दहशतवाद्यांनी माझ्या बहिणीला आणि तिच्या पतीला मारलं. माझ्यावर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या जाण्याचे दुःख मला शब्दात सांगण्या इतपत नाही.” अभिनेत्री पुढे व्हिडीओमध्ये म्हणते, “आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम दाखवलेत. मला चांगला पाठिंबा दिला. पण मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. मी सोशल मीडियावर माझी बहीण, तिच्या पतीचा आणि तिच्या दोन मुलांचा फोटो शेअर केला होता. जगाने आमचं दुःख पाहावं म्हणून मी ते फोटो शेअर केलेय. पण पॅलेस्टाईनचा प्रपोगंडा कसा चाललाय हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. हा प्रोपॅलेस्टाईन प्रपोगंडा इस्रायलच्या नागरिकांना खलनायकी वृत्तीचे दाखवत आहेच. ही बाब चुकीची आहे. स्वत:चा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाहीये. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करीत नाही, ही बाब मला इथे स्पष्ट करायची आहे.” असंही ती व्हिडीओमध्ये म्हटली आहे.टेलिव्हिजन अभिनेत्री मधुरा नाईकबद्दल सांगायचे तर, ती एक टिव्ही अभिनेत्री असून तिने अनेक प्रसिद्ध टिव्ही मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. नागिन, प्यार की एक कहाणी, तेनाली रामा, कॉमेडी क्लासेस, कहाणी घर घर की अशा अनेक मालिकेच्या माध्यमातून तिने चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

COMMENTS