Homeताज्या बातम्यादेश

हल्ल्यानंतर एनआयएच्या अधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा

कोलकाता ः राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकार्‍यांवर शनिवारी हल्ला करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर या अधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा द

राज्यात पुढील 10 दिवस जोरदार पावसाची शक्यता
राहुल गांधींनी अंबाला ते चंदीगड असा ट्रकने प्रवास केला
बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार l

कोलकाता ः राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकार्‍यांवर शनिवारी हल्ला करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर या अधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 एनआयएचे पथक भूपतीनगर येथे एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोन अधिकारीही जखमी झाले होते. आता या घटनेत तपासासाठी गेलेल्या ‘एनआयए’च्या अधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. जमावाने हल्ला केल्याच्या काही तासांनंतर आता पोलिसांनी एनआयएच्या अधिकार्‍यांवर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पश्‍चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर पोलिसांनी शनिवारी रात्री भूपतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत एनआयएच्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. एनआयए अधिकार्‍यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

COMMENTS