Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्यासह पाच जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला एकाने काळिमा फासली आहे. जन्मदात्या पित्यासह पाच ज

दर्शनाच्या खूनातील कटर जप्त
सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी झाली चोरी
भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थाने निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला एकाने काळिमा फासली आहे. जन्मदात्या पित्यासह पाच जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 13 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारी नंतर वाडीलांसह शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दीर अशा पाच जणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचाराची ही घटना 8 एप्रिल ते 29जून 2024 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून एकाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने, व जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर प्रकार उघडकीस आला आहे. समाधान लवटे (वय 40), प्रताप धायतडे, नितीन हराळे (वय 32), सागर हराळे (वय 20) आणि पीडित मुलीचा पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिस कोठडीत आहेत. या घटनेची हकीकत अशी की, पीडित मुलगी युट्यूबवर व्हिडिओ पाहत होती. यावेळी आरोपी समाधाव लवटे हा तिथे आला. यावेळी त्याने पीडितेला या व्हिडिओप्रमाणेच तुझ्यासोबत करेल. यानंतर त्याने मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पीडित मुलीने वडिलांना सांगितली. मात्र, वडिलांनी तिला आपली बदनामी होईल असे सांगून हा प्रकार कुणाला सांगू नको असे सांगितले. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. काही दिवसांनी ती आजारी पडली.

COMMENTS