वाळूज औद्योगिक नगरीतील जी सेक्टर मधील अनिल पॅकेजिंग कंपनीला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वाळूज औद्योगिक नगरीतील जी सेक्टर मधील अनिल पॅकेजिंग कंपनीला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - वाळूज औद्योगिक नगरीत आज पहाटेच्या सुमारास अनिल पॅकेजिंग कंपनीला लागलेल्या भीषण आगीत अनिल पॅकेजिंग कंपनीच्या मालम

आईकडून पोटच्या मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न
विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
 छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढोल वाजवत धरला ठेका

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – वाळूज औद्योगिक नगरीत आज पहाटेच्या सुमारास अनिल पॅकेजिंग कंपनीला लागलेल्या भीषण आगीत अनिल पॅकेजिंग कंपनीच्या मालमत्तेसहित कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी वाळूज परिसरातील जी सेक्टर मध्ये G-39/7/1 मध्ये अनिल पॅकेजिंग ही कंपनी आहे. या कंपनीत कागदी पुठ्ठ्याचं उत्पादन घेतले जाते. आज सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने या आगीत कंपनीचे 50 लाखाचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेची  माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाची एक गाडी तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्या. साडेचार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलांकडून आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. मात्र या आगीत कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

COMMENTS