Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून

औरंगाबाद शहरातील घटना दोघेही गंंभीररित्या जखमी

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणार्‍या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर

‘शासकीय योजनांची जत्रा’ची प्रभावी अंमलबजावणी करावी ः विभागीय आयुक्त केंद्रेकर
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
तक्रारदाराने फोडली पोलिस आयुक्तांची गाडी

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणार्‍या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील धक्कादायक घटनेत प्रियकराने स्वत:ला पेटवून प्रेयसीला मिठी मारल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरात सदर धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोघे प्रेमीयुगुल गंभीररित्या जखमी झाले आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे असे प्रेमीयुगुलाचे नाव आहे. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. दोघे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुलगी संस्थेत प्रोजेक्ट करत होती, त्यावेळी हा तरुण तिथे आला. केबिनचा दरवाजा त्याने लावला आणि त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यानंतर मिठी मारली या तरुण आणि तरुडी दोघेही भाजलेले आहेत. गेले काही वर्ष हे दोघे सोबत होते. मात्र मुलींने लग्नास नकार दिला आणि त्यातून त्यानंतर हा सगळा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS