Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - धोत्रा ता सिल्लोड येथे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत

ड्रेनेजच्या गॅसने चक्कर येऊन मजुराचा मृत्यू
दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची अजिंठा लेणीला भेट
छ.संभाजीनगरमध्ये 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – धोत्रा ता सिल्लोड येथे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या सिलबंद गव्हाच्या पाकीटमध्ये सडलेला भलामोठा उंदीर निघाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विश्वजीत प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य 2 दिवसाआधी घरी आणले होते. लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारांतर्गत धान्य आणले यातील गव्हाचे सिलबंद पाकीटातून मधून घरी शंका आली म्हणून फोडून पाहिले असता त्यात भलामोठा उंदीर निघाला यातून प्रचंड दुर्गंध येत होता. आता प्रश्न हा आहे की, याची जबाबदारी कोण घेईल. असे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नव्हे. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेता ते पाहणे महत्वाचे ठरेल. आता हे धान्य पॅक करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना शासन काय शासन करेल तेही पहाणे गरजेचे आहे

सहा महिने ते तीन महिन्याच्या तीन वर्षाच्या मुलांना आहार पुरविला जातो. पालकांना लाभार्थ्याच्या घरी हा आहार देण्यात आला होता. घरी नेऊन गव्हाचे पाकीट उघडल्यानंतर वृत्त अवस्थेतला उंदीर आढळला आणि ते पाकीट घेऊन पुन्हा अंगणवाडीत आले. त्या पाकिटातील आहे तो ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्या गावांमधील अंगणवाडीतील इतर मुलांना पुण्यात आला होता तो परत घेऊन पूर्णतः वितरण बंद करण्यात आले आहे. हा आहार पुरवठा महाराष्ट्र राज्य महासंघाच्या वतीने हा गरोदर माता यांना पुण्यात येतो. प्रयोगशाळा तपासणीनंतर जो अहवाल येईल त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया प्रसाद मिरकले यांनी दिली आहे.

COMMENTS