पाथर्डी प्रतिनिधी - देशातील सर्वात मोठा सण असलेल्या दिपावलीनिमित्त आ.मोनिका राजळे यांनी मंगळवारी कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालय

पाथर्डी प्रतिनिधी – देशातील सर्वात मोठा सण असलेल्या दिपावलीनिमित्त आ.मोनिका राजळे यांनी मंगळवारी कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार आणि दिवाळी फराळ या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे अनेक नेते तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.यामुळे कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.
यावेळी कार्यक्रमस्थळी आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह माजी जि.प.सदस्य राहुल राजळे,युवानेते कृष्णा राजळे यांनी स्वागत करुन शुभेच्छांचा स्विकार केला.यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी झालेल्या नूतन सरपंच व सदस्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. दरम्यान दिवाळी फराळासाठी सर्वात प्रथम माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी हजेरी लावत आ. राजळे व उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व कार्यकर्ते उपस्थित होते. राम शिंदेनंतर त्या ठिकाणी दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी उपस्थित राहत आ. मोनिका राजळे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
यानंतर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.शुभेच्छांचा स्विकार आणि नवनिर्वाचितांचा सत्कार यातून वेळ काढत युवानेते कृष्णा राजळे जेवणावळीच्या मंडपात जावून प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत होते.
या कार्यक्रमांसाठी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसह प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर,गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे,विष्णुपंत अकोलकर,अभय आव्हाड,डॉ. मृत्यूंजय गर्जे, नंदकुमार शेळके,माणिक खेडकर,अमोल गर्जे,बंडू बोरुडे, महेश बोरुडे,अनिल बोरुडे,अजय भंडारी,पांडुरंग सोनटक्के,वैभव खलाटे, पुरुषोत्तम आठरे,सुनील परदेशी,वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, सरपंच चारुदत्त वाघ, संचालक श्रीकांत मिसाळ,ताराचंद लोढे,आशाताई गरड,मंगल कोकाटे, काशिबाई गोल्हार, भिमराज सागडे, कचरु चोथे, गणेश रांधवणे, महेश फलके, सागर फडके, कैलास सोनवणे,बापुसाहेब पाटेकर,जे. बी. वांढेकर, सचिन नेहुल,रफिक शेख,अशोक आहुजा यांच्यासह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राजेंद्र इंगळे व प्रा. किशोर गायकवाड यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार कार्यक्रमातून वेळ काढत कृष्णा राजळेनी मंडपात जेवणासाठी बसलेल्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत स्व.आमदार राजीव राजळेंच्या गुणांचे दर्शन घडवले.
COMMENTS