Homeताज्या बातम्याअग्रलेख

मृत्यूला आमंत्रण देणारा प्रवास…

विदर्भातून मुंबईकडे येणार्‍या चिंतामणीची ट्रकसोबत धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या आगीनंतर मात्र, प्रशासन खडबडून जागे झालेले पहावयास मिळत आहे. विदर्

जननायकाचा गौरव
महाविकास आघाडीतील वितंडवाद
वारकर्‍यांवर लाठीमार करण्याचे पातक…

विदर्भातून मुंबईकडे येणार्‍या चिंतामणीची ट्रकसोबत धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या आगीनंतर मात्र, प्रशासन खडबडून जागे झालेले पहावयास मिळत आहे. विदर्भातून मुंबई ये-जा करणार्‍या लोकांना इच्छित ठिकाणी सुरक्षितरित्या पोहचविण्यासाठी सुरु झालेल्या शासनाच्या परिवहन विभागाच्या अपयशामुळे खाजगी प्रवाशी वाहतूकीसाठी अलिशान लक्झरी सुरु झाल्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाडी मालकांकडून क्षमतपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक व वाहनांच्या वेगांची मर्यादांचे पालन केले जात नसल्याचेही यातून समोर येत आहे. याचाच एक भाग म्हणून अलिशान गाड्यांच्या वातानुकुलीत यंत्रणांची नियमित तपासणी आदी बाबींची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, ही तपासणी कशी केली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. तसेच हे सर्व करताना प्रशासकिय यंत्रणेचा हात मोठा आहे. ह्या यंत्रणेने योग्य पध्दतीने काम केल्यास अशा घटना कमी करू शकतो. मात्र, मालदार जिल्ह्यात चांगला हात साफ करता येतो, म्हणून पैसे देऊन पोस्टींग घेणार्‍या अधिकार्‍यांना कामापेक्षा दामात रस असल्याचे दिसून येत आहे. अशा पध्दतीने गाड्यांची क्षमतेच्या चाचणी करण्याचे निमित्त काढून कागदी घोडे नाचविण्याच्या नावाखाली लुटमारीचा डाव खेळला जात आहे.  
राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गासह मुंबई सारख्या शहरात कीती वर्षे जुन्या वाहनांना प्रवेश दिला जावा यासाठी प्रदुषण मंडळाने नियमावली बनविलेली आहे. त्यानुसार दिल्ली शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या हेतूने वाहने हद्दपार करण्यात आली. अशी वाहने ग्रामीण भागात सर्रास वापरली जातात. त्यांच्या तांत्रिक अहवालाबाबतची तपासणी उप प्रादेशिक परिवहन विभागाने करायला हवी असते. मात्र, उप प्रादेशिक परिवहन विभागातील एजंटगिरीचा सुळसुळात असल्याचे पहावयास मिळते. या एजंटगिरीमुळे पाकिट पोहोचताच अहवाल सकारात्मक बनतात. तसेच संगणक प्रणालीच्या अधारे हे अहवाल तयार होत असले तरी मानवाचा हस्तक्षेप असल्याने अशी दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. रस्तांचा दर्जा सुधारत चालला आहे. त्यानुसार प्रशासनाने लोकांचा प्रवास सुखाचा होण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. महामार्गाने ये-जा करण्यार्‍या वाहनांना अपघात झाल्यास त्यांना तात्काळ मिळणारी मदत देण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. नाशिक जवळ झालेल्या अपघातानंतर लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अग्निशामक दल उशिरा पोहोचली मनपा आयुक्तांकडे प्रत्यक्षदर्शींची तक्रार दाखल झाली आहे. रुग्णवाहिकाही वेळेत पोहचू शकली नाही. नाशिक येथील अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. आतापर्यंत या चौकात अनेक अपघात झाले आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातात 18 जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तातडीने या चौकातील अतिक्रमण काढून, तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेच काम वेळीच पुर्ण केले असते तर अपघाताच्या घटनेपासून बचाव झाला असता. आता प्रशासनाने तात्काळ वाहनांच्या क्षमता व कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली उकळपट्टीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तात्काळ उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्या कमाईसाठी कारवाईस प्रारंभ केल्याचे समजते. अशीच घटना औरंगाबाद परिसरात होत असताना एका आमदाराने स्वत: वाहनचालकाचा वेश परिधान करून लुटमार करणार्‍या पोलीस यंत्रणेचा पर्दाफाश केल्याची घटना अजूनही ताजी आहे.

COMMENTS