Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीचा खून करणार्‍या पतीस कठोर शिक्षा व्हावी

एकलव्य आदिवासी बहुजन संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

शिर्डी प्रतिनिधी ः चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या पतीस अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस कठो

पीआय दराडे नियंत्रण कक्षात, वंचितचा आत्मदहनाचा प्रयत्न
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे

शिर्डी प्रतिनिधी ः चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या पतीस अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या मागणी करिता एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी  संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
राहाता शहरा नजीकच्या साकुरी शिवारात तीन ते चार दिवसांपूर्वी चारित्र्याचा संशय घेऊन आरोपी सुनील शिवाजी ससाणे यांने मयत पत्नी सविता हीची फसवणूक करून आंतरजातीय प्रेम विवाह करून तिच्यावर अत्याचार करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला व तिचा  खून केला . या आरोपी विरोधात भा.द.वी.कलम 3092 व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास करून आरोपीस फाशीची शिक्षा होईल अशी कठोर कारवाई करावी. अशी मागणी आदिवासी बहुजन पार्टीच्या  वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनावर एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब जाधव जिल्हा संपर्कप्रमुख संजय साठे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना सदाफळ, माजी नगरसेविका नीलम सोळंकी, दीपक सोळंकी, दत्तात्रेय गायकवाड, सुभाष पवार, सुखदेव नागरे, इंदू नागरे, सदूबाई पवार, अनुसया पवार, ताराबाई पवार, प्रकाश नागरे, दादा मोरे, सुभाष शाख आदि नागरिकांच्या यावर स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS