मुंबई प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे य
मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आले. यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारुन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या अध्यादेशाबाबत मनोज जरांगे यांनी वकिलांशी आणि समाजबांधवांशी तब्बल तीन तास चर्चा केली यांनतर जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे थोड्याचवेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेणार असून या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर असणार आहेत
COMMENTS