‘स्वाराती’मध्ये 15 कोटींची अत्याधुनिक सीटी स्कॅन मशिन सुरू होणारकेज । पतिनिधीआंबेजोगाई - नवीन वर्षाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय

‘स्वाराती’मध्ये 15 कोटींची अत्याधुनिक सीटी स्कॅन मशिन सुरू होणार
केज । पतिनिधी
आंबेजोगाई – नवीन वर्षाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (स्वाराती) मध्ये रुग्णांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली आहे. रुग्णालयातील नवीन अत्याधुनिक सीटी स्कॅन मशिनचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले असून, 1 जानेवारी रोजी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या सुविधेसाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने राज्य शासनाने मंजूर केलेल्या 15 कोटी रुपयांच्या निधीतून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत ही मशीन पूर्ण क्षमतेने रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान: कॅनन कंपनीची ही 256 स्लाईस क्षमता असलेली मशिन, आजारांचे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक निदान करण्यास सक्षम आहे. भव्य पायाभूत सुविधा: मशीनसाठी 12 हजार चौ. फूट जागेत वातानुकूलित विभाग उभारण्यात आला आहे. चार जिल्ह्यांना आधार: बीडसह लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतील हजारो गरीब रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. शासकीय दरात सेवा: महागड्या खाजगी रुग्णालयातील चाचण्या आता शासकीय दरात उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. नवीन मशीन कार्यान्वित होईपर्यंत आम्ही तात्पुरती सोय म्हणून जुन्या मशिनला इतर ठिकाणचे पार्ट जोडून सेवा सुरू ठेवली होती. मात्र आता ही जागतिक दर्जाची अत्याधुनिक मशीन सुरू झाल्याने गरीब रुग्णांना वेळेवर आणि परवडणारी उपचार सुविधा मिळेल, याचे मोठे समाधान आहे. ‘स्वाराती’मध्ये दररोज सुमारे 2500 रुग्णांची ये-जा असते. अपघातग्रस्त किंवा गंभीर आजारांसाठी सीटी स्कॅन अत्यंत महत्त्वाचे असते. गेल्या काही काळापासून जुनी मशिन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांना खाजगी लॅबमध्ये धाव घ्यावी लागत होती. नवीन यंत्रणेने अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोठा हातभार मिळेल. ही मशीन कार्यान्वित झाल्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार शक्य होतील, हे आमच्यासाठी मोठे समाधानाचे कारण आहे. ही आधुनिक सीटी स्कॅन सुविधा केवळ बीडच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांसाठीही अत्यंत लाभदायी ठरणार असून, महागड्या चाचण्यांपासून गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS