पुणे ः साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केले

पुणे ः साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभार्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली.
पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी म्हणाले, अक्षयतृतीयेच्या निमित्ताने आज पहाटे पासून भाविकांची मंदिरात मोठी गर्दी दर्शनास आहे. गायिका मनीषा निश्चल यांचा स्वरभिषेक हा कार्यक्रम पहाटे पार पडला आहे. श्री गणेश यांचा आज शुंभ मुहर्तावर देवी शारदा सोबत थाटामाटात विवाह पार पडणार आहे. यानिमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून गणरायाला 11 हजार आंब्याचा नैवद्य अर्पण करण्यात आला आहे. गणरायाचे डोळस रूप पाहण्याकरीता भक्तांनी पहाटेपासून मंदिरामध्ये अलोट गर्दी केली आहे. अनेक वर्षापासून देसाई बंधू आंबेवाले यांच्यातर्फे गणरायाला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुरेख अशी आंब्यांची आरास करण्यात येते. सदर आरास पाहण्यासाठी पुणे शहरांसोबतच पुण्याबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल होत असतात.
COMMENTS